माधव पवार
तमाम मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान दिनाची समाप्ती दिनांक बावीस एप्रिल २०२३ रोजी होत असल्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या नायगाव फास्ट न्यूज च्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून सदरचा हा पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्यात आपला रोजा पूर्ण केला आहे
मुस्लिम समाजाच्या रमजान महिना चोवीस मार्च रोजी सुरुवात उपवासा सुरुवात झाली या महिन्यां मध्ये सर्व मुस्लिम बांधव हे उपवास धरत होते पूर्ण एक महिना उपवास धरला जातो व पाच वेळा नमाज अदा केली जातो उन्हाळ्याचे दिवस असताना ही १५ तास उपवासी राहून एक ही थेंब पाण्याचा न पिता गर्मी मध्ये उपवास पूर्ण केला जातो व पाच टाईम नमाज अदा केली जाते हे मात्र भाग्याची बाब असल्याचे घुंगराळा येथील आजमोदीन उर्फ अजीम भाई मौलाना शेख यांनी सांगितले आहे
हा धार्मिक सण सर्व धर्माच्या बांधवांनी एकत्रितपणे साजरा करून सदरच्या मुस्लिम बांधवांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पवित्र आशा रमजान उत्साहात सहभाग घेऊन मुस्लिम बांधवांचा आनंद द्विगुणी करून त्यांच्या सणात मुस्लिम बांधवांना तमाम जनतेच्या वतीने नायगाव फास्ट न्यूज च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत
पवित्र अशा रमजान महिन्यात मोठ्या पासून ते लहान मुला पर्यंत रमजान महिन्याचा रोजा धरून पूर्ण केला असल्यामुळे दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी समाप्ती होत असल्यामुळे सध्याचा सण अतिशय सर्व धर्माचे बांधव मिळून शांततेत पार पाडतील या महोत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या आणि सर्व धर्मीयांचे एक दिल निर्माण होऊन सुखा समाधानी बांधव नांदतील हीच अपेक्षा करण्यात येत आहे

0 Comments