Header Ads Widget

राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस खुळ खुळ चालकासह वहाकाचा काय दोष ? - घुंगराळा येथे बसचा खालचा भाग खाली गळाला !!

       
        माधव पवार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस शासनाच्या बेजबाबदारपणामुळे हैद्राबाद कामारेडी बिलोली नांदेड ही नांदेड कडे येत असताना शिवशाही लांब पल्याची बसचा समोरचा भाग म्हणजे समोरच्या दोन टायर समोरील भंपर खुळखुळ होऊन खाली गळाला असल्यामुळे शिवशाही बसची अवकळा दिसून आली आहे

मोजे घुंगराळा येथे गतिरोधक वर तुटून खाली लोळत असताना चालकानी वेळीच लक्ष देऊन सदरचे भंपर  वर बांधले सदरचा प्रकार दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटानी घडला आहे

राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस खुळ खुळ झाली असून यात चालकासह वहाकाचा काय दोष ?  असा प्रश्न जनतेतुन केला जात असून अशा लांब पल्याच्या बसेस टकाटक असल्या पाहिजेत जेणेकरून वाटेतच खोंळबा होऊन नये बस डीपी मधून बाहेर निघण्या पूर्वी गाड्याची दुरुस्ती चौकशी करून रस्त्यावर काढल्या तर योग्य ठरेलं असा ही प्रश्न जनतेतून केला आहे

सदरच्या बस चालकांनी शिवशाही बसच्या भंपरला खाली पडू नये कोणत्या  दोरीचा उपयोग वर बांधला परंतु तुटून जात होते नंतर मोटार सायकलच्या गेॅरेजवर जाऊन मोटार सायकलचे क्लस वायर माधव यमलवाड घुंगराळा यांनी आणून दिले चालकाने भंपरला बांधून नांदेड कडे घेऊन गेले सदरचे भंपर नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर खाली रस्त्याने घासत गेले होते

शिवशाही बस गाडी एवढी खुळखुळ झाली असेल इतर बस गाड्या कीती खुळखुळ झाल्या असावेत असे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे



Post a Comment

0 Comments