Header Ads Widget

एकीकडे आयुष्यमान भारत दुसरीकडे कुंटूर प्राथमिक आरोग्य केंदा अंतर्गत उपकेंद्र घुंगराळा येथे औषधाचा तुटवडा -

       माधव पवार
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामीण भागातील असलेल्या नायगाव तालुक्याच्या कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्र घुंगराळा येथे गेल्या अनेक दिवसापासून औषधाचा तुटवडा निर्माण झाला असताना सुद्धा आरोग्य विभागाच्या डोळे झाक पणामुळे आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून कोळंबा असल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या मोजे घुंगराळा येथे उप आरोग्य केंद्र असून या दवाखान्यात औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असला तरी एकीकडे आयुष्यमान भारत म्हणून दवाखान्यावर नाव टाकण्यात आले दुसरीकडे मात्र या दवाखान्यामध्ये औषधाचा बऱ्याच पैकी तुटवडा असल्याचे येथील नागरिकांना अनुभव येत आहे
तालुक्यातील व ग्रामीण भागात अशाच पद्धतीने अनेक आरोग्य उपकेंद्रात मोठया प्रमाणात औषधाचा तुटवडा झाला असताना सुद्धा आरोग्य विभाग झोपेतच असल्याचे सदरच्या बाबी वरून दिसते शासनाच्या आरोग्य विभागाने सदरील दवाखान्यात तात्काळ औषध उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा जनतेतून व नागरिकांतुन होत आहे

शासकीय रुग्णालय असताना सुद्धा रुग्णाला बाहेर मेडिकल आणावे लागते तर मग शासकीय दवाखान्य कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे 


Post a Comment

0 Comments