नायगाव तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या व कुंटूरकरांचा बालेकिल्ला असलेली कुंटूरची मार्केट कमिटीची निवडणूक लागली असल्यामुळे या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत निवणूक लढविण्यासाठी दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सदरच्या निवडणुकीसाठी भाजपा पक्षाच्या तीन गटाने फॉर्म दाखल केले तर शिंदे गटाने सुद्धा सदरची निवडणूक लढविण्यासाठी फॉर्म दाखल केल्याची माहिती मिळते आहे
तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी ही या भागात मोठी असल्यामुळे सदरच्या निवडणुकीची जंग पछाडण्यासाठी माजी मंत्री खा. स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे सुपुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या गटाने ही फॉर्म भरले आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्या गटाने सुद्धा फॉर्म भरले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे राष्ट्रवादीचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांच्या गटाने ही फॉर्म दाखल केले आहेत परत एकदा भाजपा गटाकडून दिलीपराव धर्माधिकारी यांच्या गटाने ही फार्म दाखल केल्याची सांगण्यात येते त्याच बरोबर सूर्यकांत पाटील कदम कुंटूरकर यांच्या ही गटांच्या वतीने फॉर्म भरण्यात आले आहेत
कुंटूर मार्केट कमिटी मध्ये शिंदे गटाच्या माध्यमातून गंगाधर बडुरे यांनी सुद्धा सदरची निवडणूक लढविण्यासाठी फॉर्म दाखल केले असल्याचे विश्वासनीय माहिती मिळत असून व भाजपा पक्षाच्या माध्यमातून तीन गट निवडणुकीच्या रिंगणात राहणार की काय ? असा प्रश्न चर्चेला जात असल्याचा जनसामान्य माणसाला पडला असला तरी या सदरच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा पक्ष व शिंदे गट या रिंगणात असणार आहे

0 Comments