माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु रहिवासी असलेले राजेसाब रमजान शेख यांचा नऊ वर्षांचा मुलगा फरहान राजेसाब शेख यांनी त्यांच्या आयुष्यातील असलेल्या पवित्र महिन्यातील रमजान महिन्याचा पहिलाच रोजा धरला असल्यामुळे सदरच्या मुलांचे सर्व धर्मातील बांधवांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे
तालुक्यातील रुई बुद्रुक येथील राजेसाब शेख यांचे चिरंजीव फरहान राजेसाब शेख यांनी दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातील रोज हा अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्यात धरला आहे
रुई बु.येथील माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे, सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख माझी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे विठ्ठल ज्ञानोबा पाटील शिंदे सरपंच प्रतिनिधी रावसाहेब पवार माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे आदीने सदरच्या मुलाचे अभिनंदन केले आहे
रुई बु येथील राजेसाब रमजान शेख यांचा मुलगा अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी कडाक्याच्या उन्हात धरला असून प्रथम रोजा धरणारा मुलगा हा शेख रमजान यांचा नातू आहे
सदरच्या मुलाने करत असलेले कर्तृत्व पाहून सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळराव पांडे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हनमंतराव पांडे, स्वस्त धान्य दुकानदार तथा सामाजिक कार्यकर्ता व्यंकटराव पांडे, सूर्यकांत पांडे सूर्यकांत पांचाळ संदीप पाटील शिंदे युवा उद्योजक दिलीप संभाजी पांडे यांनी त्या मुलाचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे

0 Comments