Header Ads Widget

आंतरगावच्या आजी-माजी सरपंचासह गावकऱ्याच्या विशेष प्रयत्नामुळे सेवा सहकारी सोसायटी निवडणूक काँग्रेस पक्षाचे सात तर भाजपाचे सहा संचालक बिनविरोध - चेअरमन होटाळकर गटाचा तर व्हाईस चेअरमन चव्हाण गटाचा !!

               माधव पवार
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथे दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी तरी सोसायटीची निवडणूक गावच्या आजी-माजी सरपंचसह गावकऱ्यांच्या विशेष प्रयत्नामुळे काढण्यात आल्याची माहिती माजी सरपंच मारुती हौसाजीराव पाटील तोडे यांनी दिली असून सदरची निवडणूक ही गावच्या हितासाठी लवकर यांनी एकत्रितपणे येऊन सदरचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते आहे नायगांव मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या गटाचे नवनिर्वाचित सदस्य तोडे शिवाजी शेषराव, शिंदे गंगाधर बापूजी, शिंदे बाबुराव गोविंदराव, शिंदे बाबू दिगंबर, शिंदे बालाजी कोंडीबा, शिंदे बालाजी बाबुराव, शिंदे मुरतोजी शेषराव, शिंदे शंकर गंगाधर, तोडे कचरूबाई माधवराव,शिंदे सुलोचनाबाई आनंदराव, हनमंते दत्ता मरीबा, इबितवार हनमंत मारोती, इरसनवाड नागोराव माणिका,गणपती बालाजी शिंदे, राजेश बालाजी तोडे, दत्ता पांडुरंग तोडे विद्यमान सदस्य व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील रहिवासी असलेले माजी सरपंच मारोती हौसाजीराव पाटील तोडे यांच्यासह गावचे सरपंच गजू आनंदराव पाटील तोडे त्याच बरोबर गावकऱ्याच्या प्रयत्नामुळे काँग्रेस पक्षाचे सात संचालक तर भाजपाचे सहा संचालक घेऊन सदरची सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध काढण्यात आली असल्याची माजी सरपंच मारोती हौसाजीराव पाटील तोडे यांनी दिली आहे 

आंतरगावच्या आजी-माजी सरपंचासह गावकऱ्याच्या विशेष प्रयत्नामुळे सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध तर काँग्रेस पक्षाचे सात तर भाजपाचे सहा संचालकाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे


Post a Comment

0 Comments