Header Ads Widget

हिंगोली येथे ३३ लाखाच्या धान्य प्रकरणात नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांना हायकोर्टा कडून जामीन मंजूर

       माधव पवार  
हिंगोली येथील तत्कालीन व सध्याच्या परिस्थितीत नायगाव तहसील कार्यलयात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष गजानन तहसीलदार शिंदे यांच्यावर ३३ लाखाच्या धान्य प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु हाय कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजला प्राप्त झाली आहे 

नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी हिंगोली येथे कार्यरत असताना कार्यालयाच्या पुरवठा विभागातून सन २०१९ जानेवारी ते २०१९ च्या जुलै सहा महिन्याच्या कार्यकाळात ऑफलाइन धान्य वाटप केलेल्या प्रकरणात १४७ गुन्हेगार ? होते त्यापैकी ११६ स्वस्त धान्य दुकानदारानी पैसे भरले आणि १६ दुकान दारानी ? पैसे भरले नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरचे प्रकरण कोर्टात गेले असल्याचे सांगण्यात येत होते परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली व नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून तहसीलदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु सदरची कारवाई अन्याय कारक ? असल्याचा तहसीलदार गजानन शिंदे यांनी आरोप ही केला होता परंतु हायकोर्टा कडून त्यांची जामीन मंजूर करण्यात आली आहे 




Post a Comment

0 Comments