Header Ads Widget

शेतकऱ्यांची रुई बु येथील पांडे डीपी तात्काळ मिळवून देऊ - सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव -

            माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या मौजे रुई बु येथील विद्युत महावितरणची पांडे डीपी वरील शेतकऱ्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात चालू बिले भरले आहेत परंतु ही सदरची डीपी गेल्या दहा १५ दिवसाखाली जळाली असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे सदरच्या डीपीचा आवाहल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला आहे

   "साहेब आम्हांला पांडे डीपीचे ट्रांसफार्मर द्या हो "

रुई बु येथील विद्युत वितरणचा पांडे डीपी गेल्या १५ दिवसाखाली जळाला असल्यामुळे आमच्या शेतातील हुभे पीक वाळून जात असून यात ऊस, भुईमूग, ज्वारी, आणि डीपी बंद असल्याने जनावराना सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे साहेब आम्हाला लवकर डीपी द्या हो अशी मागणी सूर्यकांत शंकरराव पांडे यांनी केली आहे 

तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत असलेली रुई बु येथील पांडे डीपी चार पाच दिवसात शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले असून सचिन पांडे डीपी जळाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे खंत ही साहेब अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केले आहे

मौजे रुई बु येथील पांडे डीपी मिळवून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाना त्या बाबतीत पत्र पाठविण्यात आले ऑइल मिळत नसल्यामुळे थोडा फार वेळ लागत असून शेतकऱ्यांकडे पन्नास हाजार रुपये मागील असले तरी सदरची डीपी मिळवून देण्यासाठी कृष्णूर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव हे प्रयत्नशिल आहेत

सदरच्या शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी कांही दिवसातच पांडे डीपी उपलब्ध करू देऊ असे ही सहाय्यक जाधव यांनी सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments