नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेसह अन्य बँकाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कोट्यावधी रुपयाचा आर्थिक व्यवहार खोळंबला असून दिनांक १ एप्रिल २०२३ रोजीच्या सकाळपासूनच बंद असल्यामुळे बँकेच्या खातेदारासह ग्राहकांची मोठ्या प्रमाणात रक्कम उचलण्यासाठी तारांबळ उडाली आहे
नायगाव तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेचे सदरचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेचे सर्व सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांची तारांबळ झाली सी एस पी सेंटरची डोकेदुखी ठरल्यामुळे फोन पे,गुगल पे,पे टी एम,युपीआय हे सर्वच बंद असल्यामुळे कोठ्यावधी रुपयाचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला असल्याने बँकेच्या शाखाधिकार्यांनी तात्काळ चालू करून होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात राष्ट्रीय कृत बँका आहेत त्या बँकेत शेतकऱ्यांचे बँक खाते आहेत ठेवलेली रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या खातेदाराची बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे मोठी तारांबळ झाली परंतु गैरसोय सुद्धा झाली असल्याचे दिसून आले आहे
बँकेत रक्कम मिळत नसल्यामुळे सेवा ग्राहक यांच्या कडे जाऊन पैसे उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय कृत बँकेसह अन्य बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने कुठेच पैसे मिळत नसल्यामुळे खातेदारासह ग्राहाकातुन संताप व्यक्त होत असल्याचे दिसून आले आहे

0 Comments