Header Ads Widget

घुंगराळ्यात साऱ्या देशाचा बाप माझा पॉवर फुल भीमराव आंबेडकर व माझ्या शिवबाची तलवार हे रेकॉर्ड लावून १३२ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने गावातील सर्व धर्माचे बांधव जयंती सोहळ्यात सहभागी होऊन सदरचा जयंती सोहळा उत्साहात पार पाडला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्नाच्या जयंती सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी परिसरातील बांधव व  महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याच्या मिरवणुकीत साऱ्या देशाचा बाप माझा पॉवर फुल भीमराव आंबेडकर व माझ्या शिवबाची तलवार हे रेकॉर्ड लावून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली सदरच्या जयंतीची मिरवणूक दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान बोद्ध विवाहरा पासून ते गावातील मुख्य रस्त्यानी काढण्यात आली आहे
घुंगराळा येथील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर भारतीय घटना काराची जयंती मोठया थाटात निघाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य तैलचित्र वाहनावर लावले होते या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भीमा कोरेगाव  या धर्तीवर डिझे वर रेकॉर्ड लावण्यात आले होते
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे घुंगराळा येथे अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी भीम गिते लावून मेरे भीम का दिवाना त्याच बरोबर माझ्या शिवबाची तलवार व साऱ्या देशाचा बाप माझा पॉवर फुल भीमराव आंबेडकर रेकॉर्ड लावून १३२ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे 
डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंती सोहळ्याच्या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार संतोष कुमरे यांच्यासह पॉ.का. अशोकराव घुमे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

जयंती सोहळा पाहाण्यासाठी तालुक्यातील अनेक भागातून भीम सैनिक आले होते सदरील जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह जयंती सोहळ्याचे अधिकारी व पद अधिकारी यांनी मोठा सहभाग नोंदवला होता 




Post a Comment

0 Comments