हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात १८ पैकी १८ जागा जिंकून एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तर माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गटाला एकही जागा जिंकता आली नाही. आजी , माजी आमदारांनी सदरील निवडणुक ही अतिशय प्रतिष्ठेतेची केली होती. उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत घेवून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासमोर मोठे अवाहन उभे केले होते. अतिशय चुरशीच्या लढतीत मतदारांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस ला कौल दिला आहे.
१८ पैकी १८ जागा काँग्रेस ने जिंकून कृषीउत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. विजयी उमेदवारांमध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून काँग्रेस चे प्रकाश विठ्ठलराव वानखेडे १३४ मतदान घेऊन विजयी झाले आहेत. तर काँग्रेस चेच जनार्दन रामचंद्र ताडेवाड १३३, संजय विनायक सुर्यवंशी १३३, राजेश मारोतराव चिकनेपवाड १२९, दत्ता पुंजाराम कोंकेवाड १२६, खंडू मारोती टेकाळे ११८, कृष्णा तुकाराम राठोड ११३ , यांनी अधिकचे मते घेवून, प्रतिस्पर्ध्यावर मात केली आहे. तर सेवा सहकारी संस्था विमूक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून काँग्रेस चे श्यामराव दत्तात्रय गडमवाड १२७ मते घेऊन विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ या मध्ये काँग्रेस चे सुभाष जिवनाजी शिंदे १३० मते घेऊन विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातून श्रीमती शिलाबाई प्रकाशराव वानखेडे १३८, कांताबाई सजनराव सुर्यवंशी १२९ मते मिळवून विजयी झाल्या आहेत.ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ यामध्ये रामराव आनंदराव कदम २०१, तर परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड हे विक्रमी २२४ मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघातून दादाराव सदाशिव भिसे २११ मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ या मधून धर्मराज गणपती शिरफूले २२९ मते घेऊन विजयी झाले आहेत.व तसेच आडते व्यापारी मतदार संघातून संदिप शंकरराव पळशीकर २४३, स. रौफ स. गफूर २१५ मते मिळवून विजयी झाले आहेत. हमाल मापाडी मतदार संघातून शेख मासूम शेख हैदर यांनी १४१ मते मिळवून विजय संपादन केला आहे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सि. एल. मगर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी काम पाहीले आहे. पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयाचे शिल्पकार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत भव्य विजयी मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला आहे.

0 Comments