शहरातील गजबजलेले ठिकाण असलेले आयोध्या नगर येथे २३ एप्रिल च्या मध्यरात्री माजी जिल्हा परिषद अनिल पाटील बाभळीकर यांच्या घरी दोन ते तीन अज्ञात चोरांनी चेहऱ्यावर मास बांधत हातात कटर हत्यार साहित्य वापरत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे
तर राजेश बार च्या पाठीमागे त्याच गल्लीमध्ये बाजूलाच असलेले विश्वंभर नारायण मामीडवार हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून घरातून दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहेआयोध्या नगर मध्ये अज्ञात पाचोरांनी प्रवेश केला दोघांनी अनिल पाटील यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे यापैकी बाकीचे तिघे जणांनी आयोध्या नगर मधील आजूबाजूच्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला व त्यांनी अनेक घरां च्या दारांना वाजवून बोंबारा केला आहे
हदगाव शहरात सध्या चोर आणि चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा चोरांनी डोके वर काढले आहे शहरातील आयोध्या नगर हे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असून नेहमी गजबजलेले ठिकाण आहे अशा गजबजल्या ठिकाणात जर चोरी होत असेल तर विखुरलेल्या नगराची हे चोर काय परिस्थिती करू शकतात या विचाराने सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहे
सदरील घटनाही अनिल पाटील बाभळीकर यांच्या घरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्यांनी पोलीस स्टेशन हदगावला अज्ञात चोरांच्या विरोधात तक्रार दिली आहे या तक्रारीमध्ये या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा व पोलीस हे रात्रीची गस्त घालत नाहीत आयोध्या नगर मध्ये अद्याप पोलिसांची रात्रीला गाडी कधी आली नाही त्यामुळे हा सर्व प्रकार झाला असल्याचा नागरिकांनी पोलिसांवर आरोप केला आहे
त्यांनी तक्रारीत म्हटले आहे संपूर्ण हदगाव शहरात एकाच रात्री चोर धुमाकूळ घालत असतील आणि पोलिसांना याचा थांग पत्ता लागत नसेल तर काय समजावे असेही तक्रारी त्यांनी म्हटले आहे आत्तापर्यंत पोलिस स्टेशन येथे रात्रीच्या चोरीच्या बाबतीत दोन तक्रारी आल्या असून उर्वरित तीन ठिकाणच्या तक्रारी येण्याचे काम चालू होते
चोरी झालेल्या ठिकाणावरून विश्वंभर मामीडवार यांच्या घरी पोलीस उपनिरीक्षक भोसले व जमादार हंबर्डे यांनी पंचनामा केला आहे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

0 Comments