नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीचा गड काबीज करण्यासाठी व सत्तेसाठी काँग्रेस भाजप एकत्र झाले असून सदरची निवडणूक दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी अतिशय शांततेत पार पडली असली तरी या मार्केट कमिटीवर युतीची एक हाती सत्ता निश्चित येणार अशी अपेक्षा आंबादासराव धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे सदरची निवडणूक जुळविण्यामागे माजी मंत्रीस्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई व राजेश देशमुख कुंटूरकर यांचे मेहुणे अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांचे योगदान आहे
तालूक्यातील कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक शांततेत पार पडली असून या निवडणुकीत आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांच्यासह मनोज पाटील मोरे टाकळीकर रुपेश देशमुख कुंटूरकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून या निवडणुकीत एकूण ७८८ मतदार होते या पैकी ७७० मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे
कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी सेवा सहकारी सोसायटीचे मतदान ३५७ होते त्या पैकी ३३८ झाले तर ग्रामपंचायतचे मतदान एकूण ३५० होते त्या पैकी ३३० मतदान करण्यात आले आणि व्यापारी गटाचे एकूण ८१ होते त्यापैकी ७२ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला असल्याची मिळाली आहे
सदरचे मतदान शांततेत पार पडावे म्हणून कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय तांबोळी आणि पोहेका जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे एकूण १७ उमेदवार होते तर अपक्ष ६ उमेदवार होते असे सांगण्यात येत व दोन पत्रकारानी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केली होती

0 Comments