Header Ads Widget

आमदार माधवराव पाटील जवळगावकर काँग्रेस माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर उद्धव ठाकरे गट हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रतिष्ठेची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक


हिमायतनगर नागोराव शिंदे -

हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली आहे
सदरची निवडणूक ही आमदार माधवराव पाटील जळगावकर काँग्रेस माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर उद्धव ठाकरे गट हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रतिष्ठेची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मानली जातं आहे 
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्व राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागून होते आज मतदान पूर्ण झाल्याच्या नंतर उमेदवाराचे भवितव्य मग पेटीत बंद झाले असले तरी दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सदरच्या निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने या मतपेटीतून कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापती जन्मास येणार आहेकृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अतिशय शांत व सुरळीत पार पडली असल्यामुळे मतदारांनी सुद्धा शांततेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे आमचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर विशेष तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी सदरची माहिती दिली आहे सदरची मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर हादगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला सदरची माहिती व प्रतिक्रिया दिली आहे

निवडणूक प्रक्रियेसाठी मातोश्री जतनबाई शेखावत प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेवर मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा तळ ठोकून आज मतदान केंद्रावर थांबले होते असी माहिती देण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments