महाराष्ट्र हादरला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोर घाट येथे एक खासगी बस दरीत कोसळून १३ ठार तर २५ जखमी झाल्याची भीती बचाव कार्य प्रगती पथावर चालू असल्याचे सांगण्यात येत आहे
खोपोली जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोर घाट येथे एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे तर २४ ते २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून या बसमध्ये एकून ४५ लोक प्रवास करीत होते असे समजते आहेसदरचा हा अपघात १४ एप्रिल २०२३ च्या पहाटेच्या सुमारास घडला असल्याचे समजते अपघाताच्या नंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून अधिक माहितीनुसार,ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती
तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून आत्ता पर्यंत १६ जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आल्याचे कळते आणखी बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे
रोपच्या साहाय्याने जखमी आणि मृतांना वर काढण्यात येत असून या बचावकार्याचा करणारे मोठया वेगाने करत आहेत अंगावर काटा आणणारा ही सदरची दुर्घटना असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुचना दिल्या आहेत. मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली असून जखमी झालेल्या सर्वांचा खर्च सरकार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments