Header Ads Widget

नयन कल्याण यांची वैद्यकीय परीक्षेत उत्तुंग भरारी

नागेश कल्याण / मधुकर जवळे - 
नायगाव शहरातील सामान्य कुटुंबातील असलेल्या नयन रघुनाथ कल्याण या विद्यार्थिनीने नुकतेच आलेल्या वैद्यकीय परीक्षेच्या शेवटच्या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रातील आपली उत्तुंग भरारी सिद्ध केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

सहसा ग्रामीण भागात मुलीच्या उच्च शिक्षणाकडे आज ही बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष केलं जातं.. पण, आपल्या मुलीने वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करावे यासाठी आपल्या जेमतेम कमाईतून तिच्या शिक्षणाकडे कसलीच उणीव न भासू देणारे तिचे आई वडील यांच्या परिश्रमाची जाण ठेवुन डॉ .नयन कल्याण या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपली गुणवत्ता अखेर वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या उत्तुंग यशातून सिद्ध करून दाखवली आहे. 

आजोबा शेती व व्यावसायिक वडील एका खाजगी विद्यालयात ग्रंथपाल आई उत्तम ग्रहणी अशात नयननी आपल्या कुटुंबाची मान उंचावत वैद्यकीय परीक्षेत आपली चमकदार कामगीरी करूण दाखवत २०२२ - २०२३ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर  नाशिक येथून वैद्यकीय परीक्षेतील अंतिम वर्षांत प्रथमश्रेणीत वैद्यकिय परिक्षा उत्तीर्ण केली.  तिच्या या कामगिरीबद्दल तिचे गुरूजन, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments