निज़ामाबाद छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्र दर्पण आयकॉन पुरस्कार देऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी नेहमीच लढणारे युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. लक्ष्मीकांत गोविंदराव कलमूर्गे यांना ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलन अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले आहे.
डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे हे नेहमीच सामाजिक कार्यात तसेच सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. यांची निवड ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नयनचंद्र सरस्वते, मुख्य संपादक प्रा. गुलाबराजा फुलमाळी, कार्यकारी संपादक डॉ. सुनील पवार, समन्वयक सुनीता कपाळे, संयोजन समिती अंगद दराडे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या पहिल्या महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्र दर्पण आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच डीएड - बीएड धारकांना होणाऱ्या अन्यायाबद्दल वाचा फोडून वेळोवेळी युवा रोजगार परिषदेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यात आले
कोरोना काळात रस्त्यावरील भिकारी आणि बेघर लोकांना दररोज ४० ते ५० जणांना सतत तीन महिने अन्नदान केले असून अनेकांना वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडवित असतात. यापूर्वी नांदेडरत्न पुरस्कार आणि दिल्ली येथील दी बेस्ट युथ लीडर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. लघुकादंबरी मैत्री - निर्मळ मनाची आणि अण्णा हजारे यांच्या जीवनचरित्र जनहितपाल या हे दोन्ही पुस्तके प्रकाशित केले आहेत.
राजकारण - समाजकारण - साहित्य क्षेत्र - पत्रकारिता - वैद्यकीय क्षेत्र अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात अनुभव असलेले बहुआयामी नेतृत्व आहेत. सामाजिक कार्याची दखल घेऊन आयोजकांकडून पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देण्यात आले आहे. साहित्य संमेलन चे आयोजन महाराष्ट्र साहित्य दर्पणचे मुख्य संपादक प्रा. गुलाबराजा फुलमाळी यांनी केले आहेत.

0 Comments