Header Ads Widget

कृष्णूर ते बरबडा रस्त्या वरील पुलाची अखेर प्रशासनाला आली जाग - माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला अन आमदार राजेश पवारा कडून निधी उपलब्ध

       
       
        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा मार्गावर रखडलेल्या पुलाचे काम चालू करण्यात आले असून उशिराच का होईना परंतु काम मार्गी लागले अशी चर्चा होताना ऐकावयांस मिळत आहे 

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे नायागांव विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार वसंतराव चव्हाण यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत तर विद्यमान आमदार आमदार राजेश पवार यांनी सदरच्या पुलासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात अनेक कामे आमदार राजेश पवार यांनी मंजूर करून घेतले व निधी ही भक्कम आणल्याचे सांगण्यात येते सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील कृष्णूर व बरबडा मार्गावर असलेल्या अतिशय महत्वाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असली तरी सदरची गुत्तेदाराने पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण केले योग्य आणि लोकांना जाण्या येण्यासाठी जवळचा व सोपा मार्ग ठरणार आहे

तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी तेरा कोठी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते व टेंडर ही निघाले असल्याची उपद्रर्वी लोकांतुन चर्चा करण्यात आली परंतु अद्याप रस्त्याचे काम चालू करण्यात आले नसल्यामुळे आता वेगळ्याच चर्चाला उधाण आले आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी थोडं लक्ष देऊन रस्त्याच्या कामाला प्रधान्य दिले तर रस्ता मार्गी लागेल अन्यथा सन २०२४ साला शिवाय पर्याय नाही असे ही सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे 


Post a Comment

0 Comments