Header Ads Widget

शिराढोण येथे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजाची जयंती उत्साहात !!


शिराढोण
: शिवकांत डांगे : 

लिंगायत धर्मगुरु क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९२ वी जयंती मोठया थाटात संपन्न करण्यात आली असून यावेळी शिराढोण ग्रामपंचायत कार्यालयया पासून ते महात्मा बसवेश्वर चौक बस्टँड पर्यंत ढोल ताशाच्या गजरात सदरच्या महापुरुषाची जयंती साजरी करण्यात आली आहे

शिराढोण ते महात्मा बसवेश्वर पुतळा कौठा नांदेड पर्यंत मोटार सायकलची जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भव्य रॅली काढण्यात आली असल्याचे आमच्या नायगाव फास्ट न्यूजच्या शिरढोण येथील प्रतिनिधीनी सांगितले असून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून यावेळी अभिवादन करण्यात आले लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान या भव्य अशा कार्यक्रमात ही त्यांनी सहभाग घेतला होता  

लिंगायत धर्म संस्थापक , क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त शिराढोण मध्ये महात्मा बसवेश्वरांच्या  प्रतिमेचे पुजन करुन आरती करण्यात आली. यावेळी शिराढोण चे माली पाटील व्यंकटराव पाटील पांडागळे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे , ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील पांडागळे , सदानंद भुरे सदस्य प्रतिनिधी नंदकुमार आप्पा देवणे  आदी उपस्थित होते 

प्रकाश चौडम सर ,सुर्यकांत आळणे ,बालाजी पा.पांडागळे , किरण पाटील पांडागळे, ईश्वर पाटील पांडागळे, साईनाथ केते सर , शिवहार पांडागळे सर,पत्रकार संगमेश्वर बाच्चे ,शिवकांत डांगे , दौलत पांडागळे , वीरभद्र आप्पा देवणे , गजानन देवणे , सह गावातील प्रमूख मंडळी तथा बसवभक्त युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता 

Post a Comment

0 Comments