Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत स्व.माजी मंत्र्याचे जावई अंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर मेव्हण्याला साथ देणार का ? आपला मित्र बालाजी मदेवाड यांना साथ देणार !!

      
        माधव पवार
स्व. माजी मंत्री तथा खा. स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर  यांचे जावई अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी गावांतर्गत चा राजकारणात काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम धरून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करीत आहेत 

परंतु सध्याच्या परिस्थितीत नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटीची निवडणूक लागली असल्यामुळे या निवडणुकी दरम्यान भाजपा पक्षाचे राजेश देशमुख कुंटूरकर हे अंबादासराव धर्माधिकारी बरबडे कर यांचे मेहुणे आहेत
नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी ही कुंटूरकरांच्या ताब्यात गेल्या अनेक वर्षापासून असून यंदाही या मार्केट कमिटीची निवडणूक लागली आहे

सदरची निवडणूक जिंकण्यासाठी माजी मंत्री स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई अंबादासराव उर्फ धर्माधिकारी बरबडेकर यांनी आपल्या मेहुण्याची बाजू भक्कम करणार की काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम करणार असा प्रश्न चर्चेला या निवडणुकीच्या दरम्यान जनतेतून केला जात आहेतालुक्यातील बरबडा हे गाव लोकसंख्येच्या तुलनेत पाहिले तर या गावांची लोकसंख्या १५ ते १६ हजारांच्या वर असल्यामुळे या गावात काँग्रेस पक्षाचे  माजी सरपंच बालाजी  मदेवाड व बाळासाहेब उर्फ अंबादासराव धर्माधिकारी यांच्या विचाराने गावांतर्गत या निवडणुका लढविल्या जात आहेत

सध्याच्या परिस्थितीत कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक लागली असल्यामुळे अंबादासराव यांची मेहुणी राजेश कुंटूरकर हे भाजपा पक्षाचे असल्यामुळे त्यांना सहकार्य करणार की याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मदत करेल हा तेवढाच प्रश्न महत्त्वाचा आहे 




Post a Comment

0 Comments