माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथे गेल्या अनेक वर्षा पासून थाटण्यात आलेल्या वीट भट्याची जिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदारानी चौकशी करावी या मागणीसाठी निवेदन कर्ते बालाजी भुजंगा पवार यांनी निवेदन दिले आहे
तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील जलीलसह पांगरीकर व अन्य वीटभट्या थाटल्या आहेत त्या वीटभटीची तात्काळ चौकशी करावी अन्यथा काही दिवसात अमरण उपोषण करण्याचा इशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला असून सदरची माती रॉयल्टीविना कुठून आली यांची चौकशी होणे आवश्यक आहे
इज्जतगाव येथे वीट भट्या थाटल्या आहेत वीट भटीला लागणारी माती कोणच्या रॉयल्टी वरून काढण्यात आली यांची ही चौकशी होणे गरजेचे असल्यामुळे सदरची चौकशी करण्यासाठी जिल्हाअधिकाऱ्यासह नायगावच्या तहसीलदाराना निवेदन देण्यात आले आहे

0 Comments