Header Ads Widget

बहुजनाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ४०० स्टीलच्या थाळ्या तर २०० स्टीलचे ग्लासच्या अनोख्या उपक्रमातुन वाढदिवस साजरा !! -

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे नरसी येथील रहिवासी असलेले मा. जि.प सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या वाढदिवसा निमित्त मित्रमंडळाने महादेव मंदिर गंगनबीड व खंडोबा मंदीर नरसी  येथे ४०० स्टील थाळी व स्टील ग्लास २०० मंदिर समितीस देणगी देऊन एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे 
दोन्ही मंदिरात मोठ्या प्रमाणात भंडारे होत असतात येथे येणाऱ्या भावीक भक्तांना स्वच्छ प्रसाद स्टीलच्या थाळीत घेण्यासाठी व खाण्यासाठी बहुजनांचे नेते तथा नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान माजी जी.प सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या डोळस विचारातून समितीस अर्पण करण्यात आले असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात येत आहे तालुक्यातील मौजे गंगनबीड महादेव मंदिर व नरसी येथील खंडोबा देवस्थानाच्या पवित्र ठिकाणी भाविक भक्त हिरवेगार कागद व सुक्ष्म मेन कापडाचा थर असलेली पात्र दिल्या जाते दोन्ही देवस्थान हे जंगल परिसरात असल्याने जनावारे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वास्तव्यास असतात भाविक भक्त जेवण केल्याच्या नंतर ते पात्र तिथेच फेकून दिले जात असल्यामुळे जनावरे खाऊन मुक्के मरण पावत आहेत त्या वरवर राहिलेले अन्न कागदावर दिसतात आणि ते पात्र मात्र त्यावर लावण्यात आलेलेला सुक्ष्म मेनकापडा लेअर गरम अन्न पात्रावर टाकल्या नंतर ते माणसाच्या खात असलेल्या अन्नात मिसळून पोटात जातो आहे 

माणसे जेवण करूत पात्रावरील शिल्लक अन्न पात्रासह फेकून देतात .फेकून दिलेले पात्र जनावरे खातात आणी आरोग्य बिघडते यामुळेच  मानव आणी पशुच्या जिवाची काळजी घेणारा पर्यावरणपूरक व आरोग्यदायी असा स्टील च्या ४०० प्लेट व ग्लास २०० ग्लास दोन्ही मंदिर समितीच्या  महादेव मंदिर गंगनबीड चे अध्यक्ष  शंकर रघुनाथ जाधव,सचिव- गंगाधर भाऊराव मोरे आदी यावेळी उपस्थित होते 
पुजारी  उमाकांत गंगाधर स्वामी  यावेळी माणिकराव लोहगावे मित्र मंडळाचे संभाजी मिसे , श्यामसुंदर कोकणे ,वैजनाथ लोहगावे, हानमंत माजंरमे , गोविंद मामा तुप्पेकर, सदाशिव माने सर , परमेश्वर लोहगावे,  व्यंकटराव भेरे, ज्ञानेश्वर भत्ते सर , प्रकाश मिसे, भत्ते सर , रामेश्वर कोकणे हे होते तर खंडोबा मदीर नरसी येथे मंदिर समिती

अध्यक्ष माधव मेकाले, माजम. अध्यक्ष माधव वडजे, सचिव हानमंत कोकणे, गंगाधर वडगावे मा. तंटामुक्ती अध्यक्ष, मारोतराव मांजरमे, भास्कर कोकणे, पांडूरंग बागडे, दत्ता भरपुरे, दत्ता गागलेगावे, नंदकिशोर कोरे, मारोती दरेगावे, शिवाजी बडूरे आदीची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments