माधव पवार
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा कंपनी कडून पैसे पडत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी बऱ्याच पैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पडत नसल्याची ही चर्चा होताना ऐकावयास मिळत असून सदरचा पीक विमा सरसकट पडतोय का ? काही तूरळक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडतोय असा ही शेतकऱ्यातुन प्रश्न केला जात आहे
ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांचे नाव पिक विम्याच्या यादीत आले नसल्याचे ही बँक शाखाधिकार्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी चार वाजण्याच्या दरम्यान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे रुपये तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सातशे रुपये अशा हिशोबाचे पैसे पडत असल्याचे मेसेज मोबाईल मध्ये धडकले असून तर काही शेतकऱ्यांचे पिक विम्याच्या यादीत नावच आले नसल्याचे सांगितले जात आहे
मागील आठवड्यात पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही पीक विम्याची रक्कम पडली होती त्यावेळी बँक खात्यावर पडलेली रक्कम उचलण्यासाठी व चौकशी करण्यासाठी शेतकरी बँकेत गेले असता त्या बँकेच्या यादीत व पीक विम्याच्या यादीत काही शेतकऱ्यांचे नावच दिसले नाही असे शेतकऱ्यांतुन बोलल्या जात आहे
तर असा कसा विमा पडतोय हा संशोधनाचा विषय बनला असला तरी पीक विमा भरताना शेतकऱ्यांना बरेच पैसे मोजावे लागले होते आणि त्या रक्कमे इतका ही विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडत नसल्याचे दिसून येत आहे

0 Comments