Header Ads Widget

नायगांव शहर काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी साईनाथ चन्नावार यांची निवड ""!!"" अभिनंदन !!

       माधव पवार
आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष सृष्टीच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगांव शहर काँग्रेस ओ बी सी सेलच्या अध्यक्षपदी साईनाथ चन्नावार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे

नायगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी सेलचे नूतन शहराध्यक्ष चन्नावार यांनी सदरची माहिती नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
नायगांव शहर काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी साईनाथ चन्नावार यांची निवड करण्यात असल्यामुळे त्याचे अभिनंदन  करण्यात येत असून सदरच्या निवड माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माधवराव आप्पा बेळगे,विजय पा चव्हाण,श्रीनिवास पा चव्हाण,सुधाकर पाटील शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आली आहे 

नायगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चन्नावार यांची ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याच्या नंतर त्यांचे विविध राजकीय क्षेत्रातून व सामाजिक क्षेत्रातील आणि मित्र मंडळींच्या वतीने साईनाथ चन्नावार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

सदरची निवड ही आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सदरची निवड करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे 

Post a Comment

0 Comments