माधव पवार
काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण राज्यासह ग्रामीण भागात गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माणिक पाटील चव्हाण यांची नायगाव युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विचाराला गती देऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मा. अशोकराव चव्हाण यांच्या विचाराची देवाण घेवाण लक्षात घेऊन नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी नायगाव युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून माणिक पाटील चव्हाण यांची नुकतीच निवड केली देशातील जातीय भेद नष्ट करणारा पक्ष व सामाजिक एकोप्पा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षाची ओळख असून अशा पक्षात काम करत असताना माणिक पाटील चव्हाण यांच्या कार्याची दाखल घेऊन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी यांनी निवड केली आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी आमदार वसंतराव चव्हाण मा श्रीनिवास पाटील चव्हाण मा.विजय पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष नायगाव मतदार संघाची युवा नेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण मा.संजय आप्पा बेळगे कॉंग्रेस यांनी माणिक चव्हाण यांची नायगाव युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी निवड केली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

0 Comments