Header Ads Widget

तहसीलदार निळे यांनी पांदन रस्त्याच्या कामा बरोबर रोजगार हमी योजनेचेच्या कामाला प्रधान्य देतील का ?

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यात गेल्या अनेक वर्षा पासून रोजगार हमी योजनेच्या कामा बरोबर पांदन रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्यामुळे कामे खोंळबली आहेत व रोजगाराना रोजगार मिळत नसल्यामुळे मजुरावर उपवास मारीची वेळ आली आहे

त्यासाठी नायगावचे नूतन प्रभारी तहसीलदार निळे यांनी पांदन रस्त्याच्या कामा बरोबर रोजगार हमी योजनेचेच्या कामाला प्रधान्य देतील का ? असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात असला तरी तहसीलदार निळे यांनी सदरचे कामे उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा या भागातील जनतेनी केली आहे

नायगावचे तत्कालीन तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्यासह तहसीलदार सुरेखाताई नांदे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील अनेक खेड्या पाड्यात रोजगार हमी योजने बरोबर पांदन रस्त्याचे कामे मोठया प्रमाणात करण्यात आले तेव्हा पासून या नायगाव तालुक्यात कसल्याच प्रकारे सदरचे शासकीय कामे चालू नसल्यामुळे रोजगार हमी योजनेचा तर चांगला फज्जा उडाला आहे


Post a Comment

0 Comments