नायगाव तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला असल्याने राजे महेंद्र मागासवर्गीय औद्योगिक संस्थेच्या स्टील री रोलिंग मिलचे शेड उडून जाऊन अंदाजे १२ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने तात्काळ पाहणी करून सदरची नुकसान भरपाई मिळवून द्यावे अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रचार्य मनोहर पुंडलिकराव पवार यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन कळविले आहे
तालुक्यातील सोमठाणा येथे दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला या वादळी वाऱ्यात सदरील संस्थेचे शेड उडून गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे
कारखान्याचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले राजे महेंद्र मागासवर्गीय औद्योगिक संस्थेचे स्टील रि रोलिंग शेड गावापासून काही अंतरावर असल्याने सदरच्या वादळी वाऱ्यात हे प्रचंड नुकसान झाले असल्याने संबंधित विभागासह शासनाने तात्काळ पंचनामा करून नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे
सोमठाणा येथील राजे महेंद्र मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थेच्या नुकसानी संदर्भात नायगावचे तहसीलदार यांच्यासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड जिल्हा निबंधक कार्यालय आणि सहाय्यक निबंध कार्यालय यांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे
सदरील सहकारी कारखान्याचे शेड वरील पत्रे व लोखंडी फ्रेम वादळी वाऱ्याने तुटून जाऊन मोठे हानी झाली सदरची योजना ही सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कडून मंजूर करण्यात आली होती
परंतु मागासवर्गीयाच्या योजना पूर्णत्वाकडे जाण्या अगोदरच अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती कोसळून सदरील कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्राचार्य मनोहर पुंडलिकराव पवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केली आहे

0 Comments