Header Ads Widget

घुंगराळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या निर्मितीसाठी पाठपुरावा चालूच - वसंत पाटील सुगावे यांची माहिती !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे व कृष्णूर अद्योगिक वसाहत जवळ आणि गावात आठवडी रविवारचा बाजार असल्या कारणाने या गावांत दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्रासह महाराष्ट्र ग्रामीण बँकेची निर्मिती करण्यासाठी मागील एक ते दोन वर्षा पासून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे मंजूर करून घेण्यासाठी अद्याप पाठपुरावा चालू असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली आहे

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बरबडा व कुंटूर येथे असले तरी घुंगराळा हे गाव तीन चार राज्याशी निगडित व गावातून राज्य महामार्ग गेल्यामुळे येथे लोकांची वर्दळ असते एखादया वेळेस रुग्णाला अचानक पणे काही झाल्यास नायागांव अथवा नांदेड व कुंटूर आणि बरबडा येथे जावे लागते आहे

वसंत पाटील यांनी त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे तात्काळ महाराष्ट्र ग्रामीण बँक मंजूर करण्यात यावी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी मागणी केली होती

घुंगराळा हे गाव आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ अशा राज्याला हा राज्य महामार्ग जोडला असल्यामुळे व जनतेची होणारी प्रचंड अडचण लक्षात राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वसंत पाटील सुगावे यांनी घुंगराळा येथे आरोग्य लवकर मंजूर करण्यात यावे म्हणून मागणी केली होती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी ती मागणी आज पर्यंत सुद्धा लावण धरली असल्यामुळे २०२३ सालाच्या शेवटी म्हणजे २०२४ वर्षा पूर्वीची हे महत्वाचे कामे मार्गी लागतील असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिनांक   १९ एप्रिल २०२३ रोजी दिली आहे 

Post a Comment

0 Comments