Header Ads Widget

शाळेतील रेकॉर्ड जाळल्या प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध लावा जिल्हाधिकाऱ्यासह पोलीस अधीक्षकांना गावकऱ्यांचे निवेदन

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथील शाळेतील सर्व महत्त्वाचे रेकॉर्ड कागदपत्र जाळण्याचा कट करणाऱ्या अज्ञात आरोपींच्या विरोधात शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण यांच्या फिर्यादी वरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी शाळेतील रेकॉर्ड जाळलेल्या आरोपीचा शोध लावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यासह पोलीस अधीक्षकांना गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अशा घटना सन २००५ साली केंद्रीय प्राथमिक शाळा येथे पहिली घटना घडली दिनांक १५ जून २०१६ रोजीच्या मध्यरात्री असाच प्रकार घडला तसेच दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजीच्या मध्यरात्री आज्ञात आरोपीने सर्व मुळे रेकॉर्ड सह अनेक महत्वाच्या फाईली जाळून खाक केल्या आहेत खरे तर ही शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रकारची वंजारवाडी या तिन्ही शाळेची हत्याच करण्यात आली आहे 
""""  कर्तव्य सपोनि महादेव पुरी म्हणतात   """"

कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी म्हणतात अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी आमची पोलीस यंत्रणा कामाला लागली असून कोणत्या ही परिस्थितीत अज्ञात आरोपीचा शोध लावून लावून त्या आरोपीला जेरबंद केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असे प्रकार जर कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असतील तर तशा गुंडवर्तीच्या अज्ञात आरोपीची गैय केली जाणार नाही असे ही सपोनि महादेव पुरी म्हणाले आहे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नंदकुमार यांच्यासह कृष्णुर विभागाचे केंद्र प्रमुख उद्धवराव ढगे आणि रुई बु जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोठेवाड आणि बासटवार यांनी प्रथम रेकॉर्ड जळीत प्रकरणी शाळेला भेट दिली आहे 


Post a Comment

0 Comments