Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने केला रद्द तर आम आदमी पक्षाला दिला राष्ट्रीय दर्जा


नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क थेट मुबंई - 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा केंद्रीय आयोगाने रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला असून तसेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा ही राष्ट्रीय दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केला सदरच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी सदरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात दगणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस मधून बोलल्या जाते जानेवारी २००० मध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता

परंतु २०१४ वर्षा पर्यंत हा दर्जा कायम टिकून होता  त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाला नोटीसा बजावल्या होत्या मिळालेल्या माहिती नुसार इतर राज्यात पक्षाचे अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस हे पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती मिळते आहे

Post a Comment

0 Comments