Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसने कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली - राष्ट्रवादी -


नायगाव  : मधुकर जवळे - 

राष्ट्रवादी काँग्रेसने कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी  पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली राष्ट्रवादी -

राज्यातले राजकारण आणि ग्रामीण भागातल्या राजकारणा मध्ये कसल्याच प्रकारचा फरक जाणवत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीची चर्चा रंगायला लागली असली तरी या सदरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतभेदाची चर्चा हळूहळू वाढायला लागली  आरोप प्रत्यारोप एकमेकावर केल्या जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आरोप काँग्रेस पक्षाचे फेटाळून लावला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने कुंटूर  मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्राने सांगितले आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी ही चर्चेचा विषय बनली असली तरी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावे तसेच सहकार्य केले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे

या निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्यासह राष्ट्रवादी सोशल मीडियाचे नायगाव तालुका अध्यक्ष केरबा रावते यांच्या समवेत व अनेकांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे 

Post a Comment

0 Comments