नायगाव तालुक्यातील रुई बु येथे दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी लागलेल्या भीषण आगीत शेतकरी किसन संभाजी सोनकांबळे यांच्या २००० असलेल्या कडब्याच्या पेंडया म्हणजे गंजीला आग लागून झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांचे एकूण ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना रुई बु येथील वस्ती वाढ मध्ये घडली आहे
नायगावच्या महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी हणमंत गोविंदराव वाघमारे यांच्यासह शेतकऱ्यांनी व जनतेने केली आहे
तालुक्यातील रुई बु येथे वस्ती वाढ मध्ये लागलेल्या कडब्याच्या गंजीला भीषण आग त्या आगीमध्ये मुक्या जनावरांना खाण्यासाठी एक ही कडब्याची पेंडी शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावराचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे सांगितले जात आहे
सदरील घटनेची माहिती गावचे सरपंच यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी नायगाव तहसीलदार निळे यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी तोरडवाड यांना माहिती देताच तलाठी यांनी किशन संभाजी सोनकांबळे यांच्या कडब्याच्या गंजीचा पंचनामा केला असल्याची माहिती रुई बु येथील तलाठी यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती दिली आहे
सदरच्या आगीत शेतकरी किसन संभाजी सोनकांबळे यांनी आपल्या शेतातील व इतर ठिकाणी कडबा खरेदी करून त्यांची गंजी लावून ठेवला होता परंतु अचानक लागलेल्या आगीत सर्व कडब्याची गंजी जळून खाक झाली असल्याने शेतकऱ्यांची ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे
रुई बु येथे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांच्या शेतीचे अवजारे ही जळून खाक झाल्याची माहिती असून यात ती पण वकर जू आणि शेती उपयोगी लागणारे इतर साहित्य आणि गुळी जळून खाक झाली असल्याने शेतकरी हाच बल झाला आहे
नायगावच्या तहसील प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत सदरील घटनेचा पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी किसन संभाजी सोनकांबळे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे

1 Comments
छान बातमी दमदार बातमी
ReplyDelete