नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील मौजे धनंज बु येथील रहिवासी असलेले नव तरुण युवकाचा दोन घटनेत दोघाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी एका तरुणांने गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या एका तरुणाला एका जनावराने धक्का मारल्यामुळे विहिरीत पडवून मृत्यू झाला असल्याची धक्का दायक घटना घडली आहे
लोहा तालुक्यातील धनंज बु येथील राहीवासी असलेले तरुण शेतकरी रोकडेश्वर बालाजीराव शिंदे वय चोवीस वर्षे असलेला तरुण बांड यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते आणि त्यांच्यावर मागील महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आले असल्याचेही सांगण्यात येते त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक तुप्पा या बँकेचे कर्ज असल्याचे ही सांगण्यात येत आहे
धनंज येथील रहिवासी रोकडेश्वर बालाजीराव शिंदे यांनी सकाळी साडे नऊ ते दहा वाजन्याच्या दरम्यान सर्व बाजूला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची ही माहिती मिळते आहे
याच गावातील म्हणजे धनंज येथील तरुण मयत शिवाजी किशनराव गवाले वय ३८ वर्ष यांना जनावराचा धक्का लागल्यामुळे विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची धक्का दायक घटना दुसऱ्या घटनेत दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी एक ते दोन वाजन्याच्या सुमारास घडली असल्यामुळे या दुर्दैवी घटनेतील दोन्ही तरुणाच्या घटनेचा पंचनामा लोहा पोलीसांनी केले असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments