माधव पवार
गेल्या अनेक वर्षांची परंपरा चालू ठेवणारे बरबडा नगरीचे विद्यमान चेअरमन अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी पवित्र अशा रमजान महिन्यातील मुस्लिम बांधवांचा रोजा सोडण्यासाठी मौजे बरबडा येथे सर्व मुस्लिम बांधवाला बोलवून स्वादिष्ट इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे
तालुक्यातील मौजे बरबडा येथे सदरच्या कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे म्हणून राजेश देशमुख कुंटूरकर उपस्थित होते यावेळी सर्व मुस्लिम बांधवाचा माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व मुस्लिम बांधवाच्या मार्फत ही धर्माधिकारी परिवाराचा सत्कार करण्यात आला आहेबरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीला गावातील जेष्ठ मुस्लिम बांधव उपस्थित होते अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडे कर यांच्या दिल मिलनच्या माध्यमातून मुस्लिम बांधवाना स्वादिष्ट इप्तार पार्टीचे आयोजन करून दिनांक १४ एप्रिल २०२३ संध्याकाळी ठिक नमाज झाल्याच्या नंतर इफ्तार पार्टीत सर्व मुस्लिम बांधवांनी रोजा सोडला आहे
बरबडा येथील सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा माजी मंत्र्यांचे जावई अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी मुस्लिम बांधवांचा रोजा सोडण्यासाठी सदरच्या इतर पार्टीचे आयोजन केले होते या विशेष कार्यक्रमाला राजेश देशमुख कुंटूरकर भास्करराव धर्माधिकारी माजी सरपंच बालाजी मदेवाड पठाण सर प्रभाकररावजी बाळासाहेब धर्माधिकारी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन व सदस्य त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य गावातील प्रतिष्ठीत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते

0 Comments