Header Ads Widget

आम्ही सुरळीत विद्युत पुरवठा करतोय " ना " आमचे बिले भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करा - मांजरम व कृष्णूर युनिटच्या सहाय्यक अभियंत्याचे आवाहन !!

              माधव पवार
नायगाव तालुक्यातील मांजरम व कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या गावात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून आमची कंपनी प्रामाणिकपणाने ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत करून लाईट देते परंतु सदरच्या लाईटचे बिले ग्राहकाकडून वेळेवर भरले जात नाहीत अथवा थकीत बिले भरले जात नाहीत सदरची बिले सुरळीत भरण्यासाठी मांजरम युनिटचे सहाय्यक अभियंता पठाण यांच्यासह कृष्णुर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी अनेक वेळा आव्हाने केले आहे

कृष्णूर व मांजरम युनिटचे सहाय्यक अभियंता म्हणतात आम्ही सुरळीत विद्युत पुरवठा करतोय "  ना " मग " तर"  आमचे आम्हाला थकीत बाकी व चालू बाकी भरून लवकर सहकार्य करावे जेणे करून विद्युत पुरवठा नेहमी सुरळी ठेवण्यासाठी आम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल असे ही या दोन्ही ही सहाय्यक अभियंत्याने नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे 

तालुक्यातील मांजरम व कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या गावातील ग्राहकाकडे मोठ्या प्रमाणात विद्युत वितरण कंपनीची वसुली असताना सुद्धा भरण्यास तयार नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही घाट्यात की तोट्यात सदरचे वास्तव चित्र हे कंपनीलाच माहीत असून सदरचे बिले भरण्यासाठी ग्राहक आणि विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन मांजरम युनिटचे सहाय्यक अभियंता पठाण व कृष्णुर युनिटचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा केले आहे 

Post a Comment

0 Comments