Header Ads Widget

भारतीय जनता पक्ष स्थापना दिनानिमित्त नायगाव येथे ध्वजारोहण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न


नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क :- 

भारतीय जनता पक्षाचा चा वर्धापन दिवस संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नायगाव येथे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून व विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यापाऱ्यांचा व शेतकऱ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे

यावेळी सन्मान करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये शेतकरी संघटनेचे नेते व्यंकटराव पाटील वडजे व्यापारी क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे बालाजी सावकार आरगुलवार उत्तम सावकार वट्टमवार संभाजी पाटील कुष्णूरकर बालाजी पाटील अंतरगावकर राघव पाटील चव्हाण रमेश सावकार मेडेवार आनंदवन महाराज घोटाळकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण भगवानराव पाटील लंगडापुरे जेष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव पाटील चव्हाण नगरसेवक चंदू पाटील चव्हाण उद्योजक शिवाजी पाटील वडजे शंकर वडपत्रे श्रीराम सेठ पत्तेवार  श्री मारुती गोटलावार शहा दत्तगिरी दत्ता पाटील मोरे रामकृष्ण मोरे अशोक येलेवाड बळवंत पाटील शिंदे लालवंडीकर आदी मान्यवरासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते

यावेळी शंकर पाटील कल्याण व बालाजी बच्चेवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या उत्तुंग यशाच्या कार्यावर मार्गदर्शन केले आहे

भारतीय जनता पार्टी १९८० रोजी स्थापन झाली पहिले अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी जना कृष्णमूर्ती मुरली मनोहर जोशी नितीनजी गडकरी राजनाथ सिंग जेपीजी नड्डा यांनी पक्षाचं नेतृत्व केलेला आहे

त्याचबरोबर आत्ता देशाचा सन्मान वाढवण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा सर्वांगीण विकास व सन्मान वाढवण्याचे कार्य मोदीजींच्या नेतृत्वात चालू असल्याचं बालाजी  बच्चेवार यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले

Post a Comment

0 Comments