Header Ads Widget

जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ.दिग्रसकरांच्या सौजन्यातुन मोफत आरोग्य तपासणी सदरचा लाभ घेण्याचे गजानन पाटील चव्हाण यांचे आवाहन

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायागांव बाजार येथे लोकसंखेच्या तुलनेत पाहिले तर ही नायगावची बाजार पेठ ही तीन ते चार राज्याला जोडली गेली आहे

यात यात आंध्रप्रदेश तामिळनाडू कर्नाटक आदी राज्याला जाण्यासाठी नायगाव येथूनच राज्य महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी रुग्णाची संख्या ही मोठया प्रमाणात असल्यामुळे नायगाव बाजार वेगवेगळ्या डिग्रीचे डॉ रुग्णाला सेवा देण्यासाठी येत आहेत

जगभरात दिनांक ७ एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले त्यात मानवा समोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले होते

विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत
.
नायगाव येथे दर वर्षी दिनांक ७ एप्रिल २०२३ हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो त्याचा मुख्य उद्देश जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर उपाय करणे असाच आहे

आरोग्य विषयी जनतेना जागरूक करण्यासाठीचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागतिक आरोग्य दिनानिमित्त नायगाव शहरातील नामांकित असलेले अमृत रूग्णालयाचे डॉक्टर दिग्रसकर व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सौजन्यातुन गरजूं रूग्णांना व जनतेना मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे

त्यानंतर ७: एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली जगात विकसीत आणि विकसनशील अशा दोन भागांखेरीज मागास असणारे देश देखील आहेत

 प्रत्येक देशाची आरोग्य समस्यांवर खर्च करण्याची तयारी आणि आर्थिक क्षमता यात देखील मोठे अंतर असल्याचे आपणास दिसते परंतु तज्ज्ञ मार्गदर्शनात अनेक देशातील अनेक समस्या कमी झाल्या याचं उत्तम उदाहरण अर्थात भारतातील पोलिओमुक्तीचे असल्या डॉ दिग्रसकर यांच्या माध्यमातून आरोग्य मोफत तपासणी करण्यात येणार आहे

तरी यांचा लाभ घ्यावे असे आवाहन अमृत रूग्णालयाच्या वतीने गजानन पाटील चव्हाण यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments