लोकसभेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या निवडणुका असो अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो आपले उमेदवार विजयी करून घेण्यासाठी राजकीय पुढार्यांना उत्सुकता असते तशाच पद्धतीने घुंगराळा येथे एका जागेसाठी निवडणूक होणार आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वार्ड क्रमांक दोन मध्ये ओबीसी महिलेसाठी जागा रिक्त असल्यामुळे या ठिकाणची निवडणूक लवकर दोन सुगावे पाटील गटात होणार असल्याचे चित्र पावह्यास मिळणार आहे
तालुक्यातील घुंगराळा येथे वार्ड क्रमांक दोन मध्ये गेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या गटाचा एक उमेदवार निवडून आला होता याच वार्ड क्रमांक दोन मधून काँग्रेस पक्षाचे साहेबराव माली पाटील यांच्या गटाची ओबीसी महिला पराभूत झाली होती
घुंगराळा येथील या वार्ड क्रमांक दोनच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यात येत असलेची माहिती मिळते आहे सदर निवडणूक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे साहेबराव माली पाटील या दोन गटात होणार आहे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे यांच्या गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला असल्याने सदरची जागा रिक्त होती त्यामुळे ह्या एका जागेसाठी लवकर निवडणूक होणार असल्याची चर्चा घुंगराळ्यासह तालुक्यात रंगायला लागली आहे
घुंगराळा येथे काँग्रेस पक्षाचे साहेबराव माली पाटील तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यात परत एकदा वार्ड क्रमांक दोन मध्ये निवडणुकी दरम्यान चांगलाच रंगदार सामना रंगणार असल्याचे चित्र आता पासूनच पहावयास मिळत आहे
ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक काही वर्षाखाली मोठ्या अटीतटीची झाली होती या निवडणूकीत वसंत पाटील सुगावे यांचे सात उमेदवार विजयी झाले होते आणि माली पाटील सुगावे यांच्या गटाच्या केवळ दोनच महिला विजयी झाल्या होत्या
या सदरच्या निवडणुकीकडे अख्या नायगाव तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते त्याच पद्धतीने आता एका जागेसाठी निवडणूक होणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगदार निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments