माधव पवार
माजलगाव : नायागांव फास्ट न्यूज थेट नेटवर्क -
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथे यात्रेत बाजूला लपून सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर झाड मारण्यासाठी व कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावरच जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यानी दगडफेक केली अल्याची घटना दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे
सदरच्या दगड फेकीत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ हे जखमी झाले असून दगडफेक करणाऱ्या जुगाऱ्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात बऱ्याच पैकी गावात यात्रा भरत असल्यामुळे त्याच प्रमाणे छत्र बोरगाव येथे देखील देवीची यात्रा भरली होती यात्रेच्या ठिकाणी सोरट नावाचा जुगार जुगारी खेळत होते सदरची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश खटकळ मिळाली आहे
सपोनि योगेश खटकळ यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून जुगार याला पकडण्यासाठी धाव घेतली कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलीस आल्याचे दिसताच जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यानी दगडफेक करण्यास सुरुवात केली असल्याने या सदरच्या दगडफेकीत ठाण्याचे साहित्य पोलीस निरीक्षक योगेश खटकळ जखमी झाले असल्याची माहिती आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश खटकळ यांनी जुगाऱ्याना जुगार अड्डा बंद करण्यासाठी सांगितले असता पोलीस व जुगार चालका तंटा निर्माण झाला यावेळी जुगाऱ्यानी अचानक पोलिसाच्या दिशेने दगडफेक चालू केली असल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ जखमी झाले झाले आहेत
सपोनि योगेश खटकळ यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर रावसाहेब जाधव परमेश्वर विठ्ठल जाधव अक्षय परमेश्वर जाधव यांच्यासह इतर अज्ञात पंदरा ते वीस जनावर ग्रामीण पोलीसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि विजय सिंह जोनवल हे करत आहेत

0 Comments