Header Ads Widget

नायगाव येथे रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विजयी उमेदवाराची विजयी सभेत नवनिर्वाचित संचालकाचा भव्य सत्कार !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील लक्षवेधी ठरलेली कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असल्यामुळे राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या गटाचा एक संचालक बिनविरोध निघाला होता त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात एकूण नऊ उमेदवार हे विजयी झाले आहेत तर युवा नेते प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्या गटाचे एकूण आठ संचालक विजयी झाले आहेत
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत विजय झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा राजे देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली विजयी सभा घेऊन संचालकांचा सत्कार करण्यात आला व सदरील विजयाच्या संदर्भात अनेकांनी मनोगत व्यक्त केले त्याच पद्धतीने रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथे विजय सभेचे आयोजन करून नूतन संचालकांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्ष एकत्रितपणे मार्केट कमिटीची निवडणूक लढविण्यासाठी राजेश देशमुख कुंटूरकर व युवा नेते प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण बरबड्याचे चेअरमन विद्यमान अंबादासराव धर्माधिकारी मनोज पाटील टाकळीकर माजी सरपंच बालाजी मदेवाड प्राचार्य मनोहर पवार यांनी ठाम पणे सदरच्या मार्केट कमिटीवर सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक लढविली आहे 



Post a Comment

0 Comments