Header Ads Widget

जेष्ठ महिला शांताबाई जोशी कोलंबीकर यांचे निधन

  
       बाळासाहेब पांडे :- 

नायगाव तालुक्यातील मौजे कोलंबी येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक तथा वै.वे शा.सं.दिगबर जोशी कोलंबिकर यांच्या पत्नी स्व.शांताबाई दिगांबरराव जोशी यांचं बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी रात्री आठ वाजता राहत्या घरी वृद्धाप काळाने निधन झाले आहे

कशाला गेली आई तु स्वर्ग आला कोण वागवेल तुझ्या या बाळाला नऊ महिने नऊ दिवसांची वारी कशी तू केली
संकट तुझला आले पदराला बांधून नेली सोडूनी का गेली, तुझ्या या लाडक्याला अ गं येना आई  येना आई येना आई गं.। कशाला गेली आई तु स्वर्गाला कोण वागवेल तुझ्या या बाळाला !!

तालुक्यातील कोलंबी येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला स्व शांताबाई दिगंबरराव जोशी यांनी मृत्यू समयी ९७ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात  दोन मुले तीन मुली सुना नातवंडे, नात सुना,पणतु असा त्यांचा मोठा परिवार आहे

त्यांच्या मूळ गावी म्हणजे कोलंबी येथे त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्या कोलंबी येथील विठल मंदिराचे पुजारी तथा ग्राम जोशी बाळू महाराज जोशी व सहशिक्षक दासा महाराज जोशी यांच्या मातोश्री होत 

Post a Comment

0 Comments