Header Ads Widget

कै. प्रदिप पाटील यांच्या गावतिडा कादंबरीचे मा.खा.भास्करराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन


विशेष प्रतिनिधी बाळासाहेब पांडे :- 


ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबात जन्म घेऊन साहित्य क्षेत्रात उंच झेप घेणारे कै.प्रदिप धोंडीबा पाटील यांनी लिहिलेल्या गावतिडा या कादंबरीचे प्रकाशन त्यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त दि.१० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कामरसपली ता. बिलोली येथे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले.
     
यावेळी व्यासपीठावर याकार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.खा.भास्कररावजी पाटील खतगावकर हे होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आ.वसंतराव पाटील चव्हाण,ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.सुरेश सावंत,समीक्षक आदी यावेळी उपस्थित होते 

प्रा.ॠषीकेश देशमुख,प्रसिद्ध कवी महेश मोरे ,लोकसंवाद साहित्य संमेलनाचे दिगांबर कदम,प्रसिद्ध कथाकार विजय जाधव, लेखकांचे वडील धोंडिबा पाटील,साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मा.भास्कर पाटील भिलवंडे आदींची उपस्थित होते.
        
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की कै. प्रदीप पाटील हे उत्तम कवी, आणि लेखक होते ते आमच्या संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी लिहिलेल्या कादंबरीचे प्रकाशन झाले पाहिजे असी अपेक्षा व्यक्त केली त्यावेळी हे प्रकाशन नांदेड येथे करु असे सांगितले

आणि सावंत सर यांचीहि तिचं अपेक्षा होती परंतु नियतीला हे मान्य नसावे त्यांच्यावर अनेक खोटे आरोप करण्यात आले त्यामुळे त्यांना व कुटुंबातील सर्व मंडळीना मानसीक त्रास झाला यातुन बाहेर पडतो न पडतो तोच कोरोनाच्या काळात सापडला आणि त्यांचे दुर्दैवाने निधन झाले त्यामुळे साहित्य क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही परंतु त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील मंडळी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केले.
     
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत कै.प्रादिप पाटील यांची पुतणी कुमारी ऋतुजा पाटील हिने गावतीडा कादंबरी आणि आबासाहेब यांची सविस्तर माहिती दिली यावेळी माजी आ.वसंतराव पाटील चव्हाण डाॅ.सुरेश सावंत, प्रा.ॠषीकेश देशमुख, प्रसिद्ध कवी महेश मोरे , मा.दिगांबर कदम, प्रसिद्ध कथाकार विजय जाधव , यांनी गावतिडा कादंबरी आणि कै. प्रदीप  पाटील यांच्या कार्याविषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले.
     
याप्रसंगी एन.डि.पवार गोळेगावकर,नंदू पा रातोळीकर,अनिल पा खानापूरकर,पांडूरंग पुठ्ठेवाड, लक्ष्मण मलगिरवार, बालाजी पेटेकर, शंकर राठोड, ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर, सोपान देगावकर, गजानन पा.पवार होटाळकर, व्यंकट आनेराये, डाॅ.बाळू दुगडूमवार, पंडित पाटील, वीरभद्र मिरेवाड व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. प्रदीप  पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी लिहिलेल्या गावतिडा या कादंबरीचे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचे कार्यक्रमाच्या आयोजकाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
  
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक पाटील कामरसपल्गालीकर, संदीप पाटील व समस्त पाटील परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरेवाड यांनी केले तर आभार दिपक पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments