माधव पवार -
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक होत असली तरी काँग्रेस पक्ष व भाजपा पक्षाच्या तोडीस तोड पक्षाचे उमेदवार नसल्यामुळे सदरची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस भाजप युतीला अतिशय सोपी आणि सरळ पद्धतीने जिंकता येणार आहे
कुंटूरची सदरची मार्केट कमिटीची निवडणूक ही काँग्रेस भाजपाच्या विजयाच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असल्याचे मा. प्राचार्य मनोहर पवार यांनी सांगितले आहे
कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपा युती झाल्याच्या नंतर १८ अपक्ष उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिला व ७६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य ३४६, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य ३३९ व्यापारी ८१ असे मतदान असल्याचे मा.प्रचार्य मनोहर पवार यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती दिली आहे
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीची निवडणुकीच्या संदर्भात माजी मंत्री स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर व दिवंगत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय होईल असी अपेक्षा बरबड्याचे सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी माजी सरपंच बालाजी मदेवाड मनोज पाटील टाकळीकर मा. प्रचार्य मनोहर पवार यांनी व्यक्त केली आहे

0 Comments