Header Ads Widget

कुंटूरची मार्केट कमिटी गतिमान करण्यासाठीच काँग्रेस भाजपाची युती - आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर -

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी ही गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात असल्यामुळे गतिमान करण्यासाठी सदरच्या मार्केट कमिटीच्या निवडणूकीसाठी राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या सोबत चर्चा करूनच काँग्रेस व भाजपाची युती करण्यात आली असे बरबड्याचे विद्यमान चेअरमन तथा माजी मंत्र्याचे जावई व बरबड्याचे विद्यमान चेअरमन आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी सांगितले आहे

कुंटूटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीचे रिंगण लढविण्यासाठी श्रीनिवास पाटील चव्हाण माजी सरपंच बालाजी मदेवाड मा. प्रचार्य मनोहर पवार त्याच बरोबर मनोज पाटील टाकळीकर यांच्या विचाराने काँग्रेस व भाजपाची सरळ सरळ युती करण्यात आली असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले आहे
कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल सदरचे आहेत आंबादासराव नरहरराव धर्माधिकारी रुपेश गंगाधरराव देशमुख मनोजकुमार रावसाहेब मोरे शिवाजीराव बळवंतराव धर्माधिकारी येसाजी देवराव कदम रेश्माजी दत्तराम जाधव हनुमंतराव ग्यानोबा पांडे सुवर्णा संभाजी जाधव प्रणिता आनंदराव हंबर्डे रमेश गंगाधर इबितवार गोविंद राजाराम परडे बालाजी देवराव कदम माधव वामनराव कदम दत्तात्रे पोचिराम आईलवार बालाजी गंगाधर लव्हाळे गोविंद दिंगाबर शेवाळे बालाजी महाजन जाधव हे उमेदवार रिंगणात आहेत
तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी उत्पन्नाचे संदर्भात कमी पडत असल्यामुळे व ते उत्पन्न वाढविण्यासाठी व विकासात्मक धोरण डोळ्यासमोर काँग्रेस व भाजपानी युती केली यात कसल्याच प्रकारचे राजकारण नव्हते असे बाळासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले आहे

सदरच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर आणि दिवंगत जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांच्या स्वप्नातील मार्केट कमिटी दर्जेदार चालण्यासाठी व शेतकऱ्यांना या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणूकीत भाजपा व काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे मान्य केले आहे

Post a Comment

0 Comments