Header Ads Widget

नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी अभियान चे उदघाटन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारीणी जाहीर

        माधव पवार
नायगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिटी राज्यातील प्रत्येक गावात निर्माण करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने नायगाव येथे नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिटी अभियान कार्यक्रमाचे उदघाटन करून बूथ कमिटी स्थापन करन्याची सुरुवात करण्यात आली व नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून बूथ कमिटी अभियानाचे जिल्हाध्यक्ष गजानन पापंटवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डी.एन. गवळे धुप्पे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष माधव बेंद्रीकर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांची प्रमुख उपस्थिती होतीयावेळी वसंत सुगावे पाटील गजानन पापंटवार सुभाषराव गायकवाड डी एन  गवळे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून बूथ कमिटी अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले व प्रत्येक बूथ कमिटी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बूथ कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी संतोष ढगे वजीरगावकर  यांची निवड करण्यात आली तसेच तालुका कार्यकारिणीच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याच्या निवडी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते  नियुक्तीपत्र दिले आहेकार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी  युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम यांनी तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नायगाव तालुकाध्यक्ष केरबा रावते यांनी मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नायगाव तालुकाउपाध्यक्ष पदी अंकुश पाटील रातोळीकर,अमोल जाधव,पांडुरंग बागडे बळवंत मोरे गंगाधर कदम दिलीप ढगे तालुका सचिव पदी साहेबराव कदम तालुका सरचिटणीस पदी बालाजी कदम आनंदा सुर्यतळ बालाजी हाळदेवाड तालुका चिटणीस पदी दीपक टेकाळे तालुका कोषाध्यक्ष पदी दादाराव रोडे तालुकासंघटक पदी शंकर शिंदे तालुका सहसंघटक पदी गोविंद हासेवाड तालुका 

सहसचिवपदी बालाजी तोडे शिवाजी गायकवाड नरसी शहराध्यक्ष पदी दिनेश सूर्यवंशी तालुका कार्यकारिणी सदस्यपदी कुमार शंकर बळवंत जाधव भागवत जाधव शंकर मोरे आदींच्या  निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले

Post a Comment

0 Comments