Header Ads Widget

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडत असलेले पैसे कशाचे शेतकऱ्यांची चेष्ठा होतोय !!

        माधव पवार 
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडणारी रक्कम कोणती आणि कोणत्या स्वरूपाची बँक अधिकाऱ्यासह शेतकऱ्याला ही समजत नसल्यामुळे खात्यावर पडणाऱ्या पैशांची शेतकऱ्यांची सरकार घोर चेष्टा करते की काय अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत असून सदरची रक्कम ही विम्याची की अन्य कोणत्या सरकारच्या योजनेची ग्रामीण भागातील शेतकऱ्याला समजायला मार्ग नसल्याचे शेतकऱ्यांतुन बोलल्या जात आहे

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडणारी रक्कम ही एका एकरला तीनशे ते चारशे रुपये पडत आहेत विम्याची रक्कम पंचवीस टक्के आहे का ? की सरकारने दुसऱ्या कोणत्या नवीन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकत आहेत असा प्रश्न त्यांचा सामान्य माणसाला पडला असून सदरची रक्कम पडत असल्यामुळे शेतकऱ्याला हसू आवरनाशे झाले असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे

संबंधित बँक शाखा अधिकाऱ्याना संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी सुद्धा ही कशाची रक्कम आणि कोणती रक्कम सांगण्यास तयार नसल्यामुळे जर २५ टक्के रक्कम मिळत असेल तर इतकी कशी कमी मिळू शकते हा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जाताना ऐकावयास मिळत असली तरी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदिकचा विमा मंजूर केला होता ते खात्यात पूर्वीच पडली आहे

अगोदर शासनाने अधिकचा विम्याची रक्कम दिली उर्वरित रक्कम पंचवीस टक्के असताना ही रक्कम कोणत्या हिशोबाची पडत असून हे सुद्धा शेतकऱ्याला करण्यासाठी मार्ग मिळत नसल्याचेही शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments