Header Ads Widget

मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री म्हणतात हे शेतकऱ्यांचे सरकार - सरपंचाने उधळले दोन लाख रुपयाच्या नोटा प्रशासन हदरले -

         माधव पवार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणतात हे शेतकऱ्यांचे सरकार तर अजित पवार म्हणतात आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी लढतोय तर गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून घेण्यासाठी सरपंचाना का ? पंचायत समितीच्या  बेजबाबदार अधिकाऱ्या कडून लाच कशासाठी मागितले जाते आहे

असा सवाल पंचायत समितीच्या कार्यालया समोर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून आले नसलेल्या नव तरुण सरपंचानी दोन लाख रुपयाच्या नोटा उधळून संताप व्यक केला आहे 
सरकार गांभीर्याने शेतकऱ्याकडे लक्ष देत नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या मनमान्य वाढल्या आहेत फुलंब्री येथील सरपंचाने पंचायत समिती समोर पैसे उधळत आंदोलन केले असल्यामुळे हे इतिहासातील पाहिलेच आंदोलन असावेत

प्रशासनाने गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांचे जीवन स्वावलंबी बनविण्यासाठी विहिरीसाठी मंजुऱ्या देत असताना दुसरी कडे अशा भ्रस्ट अधिकाऱ्यामुळे कोणते कामे नीट आणि सरळ होत नाहीत त्यांचे कारण म्हणजे भ्रष्टाचार ? सदरच्या भ्रष्टाचाराला कधी आळा बसेल हा महत्वाचा प्रश्न आहे
संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी १२ टक्के मागत असल्याचा ही आरोप गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला असून तीच रक्कम मी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याना देण्यासाठी येथे घेऊन आलो असल्याचा  संताप व्यक्त करीत आदिकची रक्कम लागली तर शेतकऱ्या कडून जमा करून देतो असा संताप ही पंचायत समितीच्या पटांगणात दोन लाख रुपये उधळत यावेळी सरपंच साबळे यांनी केला आहेगेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, माझ्या गावात विहिरीचे वीस प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी बारा टक्के रक्कम मागताहेत

कनिष्ठ अभियंता गायकवाड,ग्रामरोजगार सेविका सोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली असताना तेव्हा मी आणलेले एक लाख रुपये न घेता मला कार्यालया बाहेर जाण्यास सांगितले होते शेतकऱ्यांचे सरकार म्हणाऱ्या मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यानी शेतकऱ्याकडे कडे द्यावेत असे ही शेतकऱ्यांना वाटत आहे 

Post a Comment

0 Comments