नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात काही दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार असल्यामुळे काही दिगज पुढारी तेलंगणाच्या वाटेवर ? असल्याचे सांगण्यात येतते परंतु ना इकडे ना तिकडे असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे
सदरचा हा राजकीय भूकंप काही दिवसातच होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष नांदेड जिल्हासह राज्यात बळकट करण्यासाठी मोठ बांधली जाणार असल्याचे चित्र काही दिवसातच पहावयास मिळणार आहे
राज्यातल्या राजकीय वर्तुळात वेगळेच चित्र अनेक महिन्या पासून पहावयास मिळत असल्यामुळे या नांदेड जिल्ह्यातील काही दिग्गज राजकीय पुढारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे
ज्याप्रमाणे राज्यात गेल्या वर्षी राजकीय भूकंप झाला तशाच पद्धतीने जिल्ह्यात सुद्धा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट चित्र समोर येत आहे
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेड जिल्ह्यात दोन वेळेस विराट जाहीर सभा झाली आणि जिल्ह्यातील नामांकित पुढाऱ्यानी नुकताच काल-परवा लोहा येथे बी आर एस मध्ये जाहीर प्रवेश केला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात खिंडार पडली असली तरी सदरच्या प्रवेशावरून दिसून येते आहे
परंतु काही दिवसातच नांदेड जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत

0 Comments