Header Ads Widget

नायगाव शहरांमध्ये वीर स्वातंत्र्यसैनिकांचे स्तंभ अनधिकृतपणे पाडले ? - जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार १ मे पूर्वी हुभारा अन्यथा उपोषण - करणार गजानन चव्हाण


नायगाव  : मधुकर जवळे : 

नायगाव शहरांमध्ये मध्यव स्तीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा तैवत ठेवून ज्या वीरांनी निजामांना सळो की पळो करून सोडले होते अनेकांनी कित्येक वर्ष तुरुंगवास देखील भोगला होता कित्येकांनी आपल्या परिवारा पासून अनेक वर्ष दूर काढली मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे

अशा वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्तंभ अनधिकृत पणे पाडले असल्याची  जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे 

शहरांमध्ये २७  मे १९६०  रोजी सदरचे स्तंभ उभारले होते  हा स्तंभ सन २०२३ मध्ये कुठली ही परवानगी न घेता दुसरे स्तंभ न उभारता स्वातंत्र सैनिकांचे स्तंभ अमृत महोत्सव या वर्षां मध्ये पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले 

नायगाव शहरातील भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकरराव पा. चव्हाण,व  शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन रामराव पा. तमलुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन  संबंधितावर कार्यवाही करावी अन्यथा या विविध जनहितार्थ विषयासाठी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments