महाराष्ट्राच्या राजकारणात आणि या राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रितपणे युती असताना सुद्धा नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे गंगाधर बडूरे शिवसेना सहसंपर्क प्रमुख नांदेड यांच्यासह तिघांनी फॉर्म दाखल केले होते परंतु भाजपाच्या बड्या नेत्यानी शिंदे गटाला डावले असल्याचा आरोप बडूरे यांनी केला आहे
माजी मंत्री तथा खासदार स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे सुपुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला डावलून आप आपला पर्याय मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शोधला असल्याची चर्चा असली तरी शिंदे गटाचे सहजिल्हा संपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
शिवसेनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा पक्षाचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने राज्य चालत असताना ग्रामीण भागात भाजपा पक्षा कडून शिंदे गटाला का ? डावले गेले असा प्रश्न उपस्थित करून गंगाधर बडूरे असे सांगितले की मार्केट कमिटीच्या निवडणुकीत भाजपा पक्षाला काँग्रेस पक्ष चालते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालते मित्र पक्ष म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार का ? चालत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून एक अशेच एक किरण राज्यात अवलंबले जाते परंतु युतीच्या म्हणजे शिंदे गटाच्या उमेदवाराचा अथवा त्यांच्या गटाचा भाजपाच्या बड्या नेत्या कडून विचार केला जात नाही असे सांगत शिवसेनेचे सहसंपर्क जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे यांनी असे सांगितले की कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांचा राजकीय बळी गेला असल्याचे बडूरे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यात भाजपा शिवसेनेची युती असताना सुद्धा ग्रामीण भागात गटबाजी का ? शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपाने डावले असल्याने गंगाधर बडूरे यांनी भाजपाच्या नेत्या विषयी खंत व्यक्त केली आहे

0 Comments